तेवत ठेवा तो सच्चाईचा मन दिप
तेवत ठेवा तो सच्चाईचा मन दिप
झगमगाट आता नविन राहिला नाही
आत अंधार व बाहेर झगमगाट रोजचाच!
खोटे वाटतय... बघा त्या हाय वे वरच्या ढाब्यांवर
नविनच तयार झालेल्या चौकात लावलेल्या डिजिटल फ्लेक्स वर...
डोळे विस्फरताताच अंधारी येते डोळ्यांसमोर...
दुकान सोन विकण्यार्यांची झगमगाटाने लखलखतात!
शंका सोन विकतांना का बरे एवढा झगमगाट?
चकाकत ते सगळच सोन नसतं म्हणून?
असेल, जूनी दुकाने तग धरण्या
कर्ज़ घेऊन करतात झगमगाट दुकाना समोर...
किंमती वस्तूंच्या महागड्या दुकानात परवडत नाही
म्हणून खरेदी होते छोट्या दुकानांतुन
दिवाळी असो वा नसो
रोजच दिवसभर चालू असतात विजेवरचे उपकरणे
मग होतो एखाद्या दुकानात शॉर्ट सर्किट
जळून खाक सर्व वस्तू
दिवाळ निघत, कंबर मोडते
मोडून जातो संसार
खोट्या प्रतिष्ठेसाठी नका घेऊ कर्ज
प्रामाणिकपणाने करा धंदा...
गरज पडणार नाही झगमगाटाची!
दिवाळी असो वा नसो,
असो एखादा सण व नसो!
सच्चाई ने जिंकाल तुम्ही ग्राहकांचे मन!
पेटवलेला तो एक सच्चाईचा मन दिप प्रत्येक ग्राहकांच्या मनात ...
करा प्रयत्न.. करा प्रयत्न...
तेवत ठेवा तो सच्चाईचा मन दिप....
