STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

तेजोमय हिरा

तेजोमय हिरा

1 min
170

 स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गुजरात मध्ये हिरा जन्मला

 भारताचे पहिले पंतप्रधान मिळवण्याचा मान मिळाला.......


 मे २०१४ मध्ये पदाचा कार्यभार सांभाळला

 जनतेच्या जीवनमानात मुलाग्र गुणात्मक बदल केला....


 स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली

 देशात स्वच्छतेसाठी लोकांची चळवळ ठरली.....


 लोकशाही भारताची खरी क्षमता समोर आली

 त्यांनी केलेल्या भाषणांची प्रशंसा जगभर झाली.....


 भारत जपान दौरा यशस्वी करून दाखवला

 आखाती देशाचा दौरा सुद्धा सफलच केला.....


 सर्व दौऱ्यामुळे भारताला अनेकांची मदत झाली

 देशा- देशांमध्ये सलोख्याची नाती जुळली.....


२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित झाला

 शाळा, कॉलेज मधे योग दिन साजरा होवू लागला...


 योगामुळे आपले शरीर निरोगी राहते

 दैनंदिन जीवनात याची प्रचिती निश्चित येते....


 नरेंद्र मोदी म्हणजे साहस, करुणा, विश्वास मूर्ती

 या चमकणाऱ्या हिऱ्याची पसरतेय जगभर कीर्ती....


Rate this content
Log in