तेजाळ रवी
तेजाळ रवी
1 min
1.4K
केसरी आभा
नीलांबरी दाटली
सृष्टी नटली...
तेजाळ रवी
नभांगणी हासतो
चित्त चोरतो...
सृष्टी अगम्य
उषःकाल समयी
नयनरम्य...
गवतफुले
हरित रंगकळा
सानसानुले...
भरारी घेत
उधळती अंबरी
खग विहरी...
प्रभाती रंग
प्रसन्न करी मन
मनुज दंग...
नव पहाट
केशरी जरतारी
गुढी उभारी...
