STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

4  

SURYAKANT MAJALKAR

Others

ते! जायचे कुठे? ते गाव

ते! जायचे कुठे? ते गाव

1 min
400

ते! जायचे कुठे, ते गाव मला सांग ना

सोडून आप्तस्वकीय, भेटणारं 'नाव' मला सांग ना


ओलांडून उंबरठा, क्षितिजापल्याड झेप ती,

वदणारं अधर! तुज काळजाचा 'ठाव' मला सांग ना


पायात काटे रूतले, घुंगरु खळखळा तुटले

रणरणत्या तेजाची शपथ तुला थांब ना


तोच डाव, तीच जीत, प्रेमाची ओढ अवीट

ऐतिहासिक सत्याची पुनरावृत्ती कर ना


तारुण्याची ऐशी तर्‍हा ही, 

रोमात भिनली अजब खुमारी


सोडून भविष्य-विचार, मन तुझे मांड ना

थांब क्षणैक, मजला ते रुप दाखव ना


ते! जायचे कुठे, ते गाव मला सांग ना...


Rate this content
Log in