STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

तडतड...तडाड...

तडतड...तडाड...

1 min
234

तडतड ताशा पत्र्यावरचा

वाजला कडकडाड

लै लै देवा गॉड वाटलं

जेव्हा पाऊस पडला फडफडाड...


कान तृप्त झाले

डोळे तृप्त झाले

सोनं पाडलास मित्रा

सोनं पाडलास...


असं शहाण्यासारखं वागलास

तर तुला कोण नाव ठेवील का..?

तू आहेस नाहीस याचा

सांग मला विचार तरी कोणी करेल का..?


तुझं म्हणजे आसं झालंय

आपलं उपद्रवमूल्य वाढवायचं चाललंय

असं नको करू बाबा

लोक लै हुशार झालेत...


पाहतील पाहतील आणि

तुझा एक दिवस नाद सोडतील

पावसालाही म्हणतील आता 

आलास तर ये, गेलास तर जा....!


तेव्हा मात्र तुझी पंचाईत होईल

तुझं मोल नाहीसं होईल

वेळीच बाबा सावध हो

मी म्हणून सांगतो तेवढंच ऐक...


या लोकांचा काही भरवसा नाही

उद्या म्हणतील तुला

आता तुझं काही इथं काम नाही

पावसाविना आता काही अडत नाही...!


तेव्हा मात्र निष्काळजीपणाचं

तुझ्या तुला शल्य डाचेल

तेव्हाच नक्की सांगतो

तुला माझं आजचं म्हणणं पटेल....!


Rate this content
Log in