तब्येत जपायची
तब्येत जपायची
1 min
11.9K
दिवस तब्येती जपायचे
कसे तरी आता जगायचे
जिद्दीने जिवंत रहायचे
ऊज्ज्वल भविष्य पहायचे
विसर गमजा साऱ्या
विसर स्टाईल वाईल
बेसिक पुन्हा शिकायचे
कसे तरी आता जगायचे
आहेत बंद हे मॉल
बंद आहे ब्यूटी पार्लर
साधेच जीवन जगायचे
बेसिक पुन्हा शिकायचे
एक गोष्ट खूप छान
सोशल नाहीच व्हायचे
आपल्या आपल्या घरी
बंदोबस्तातच रहायचे
असेही जगून पाहू
दिवस जुने आठवू
होते ना साधे सुधे
तसेच आता रहायचे !
