तारांबळ
तारांबळ




कोरोना महामारी आली
शहरे लाॅकडाऊन झाली......
व्यवसाय ठप्प होऊ लागले
सारी माणसे घरातच रमले....
रोज व्यस्त जीवन जगत होते
आता जरा मुलाबाळांत लक्ष जाते...
जरासा आराम यामुळे मिळाला
माणूस घरादाराला वेळ देवू लागला...
महामारीने माणसे खूप दगावली
सेवेसाठी डाॅक्टरांची तारांबळ उडाली..
पोलीस, परिचारिका, जुंपले कामाला
लागले माणसांना शिस्त लावायला....
कितीतरी मासाने आटोक्यात विषाणू आला
जनमाणसात आनंद निर्माण झाला...
या काळात माणूसकी नाही दिसली
कोरोनामुळे जरा माणूसकी हरवली....
आता जरा सारे सुरळीत चाललेय खरे
पण कोरोनाची लस सर्व घेतील तेव्हा बरे!....