तान्हुली
तान्हुली
जंगली रस्ता खट्याळं झाडी
नागीन वळणाची दूर $$
डुलं धावती गाडी भासे
कापती तनू थुरथुर
सर्वांगातूनी नाद घुमती
इंजिन करी घुरघुर ~
डोई निळे आभाळ सुंदर
काज॓ळ पायी नूपुर
मित्र अनोखी हिरवी झाडे
तान्हुली चढे दुडदुड ~
गाव लपूनी नभात बसले
जणू अंतराळाची टूंर
धुके दाटले अवती भवती
निघे दरीतून धुर ~
शिळ वाजे वनी कुठूनी
मनात नाचे मयूर
नजर फाटती देखूनी खाली
हृदयात उठती शूळ ~
आकाश डोंगर कवेत घेई
कोकीळ देई सूर
माठ टिचकूनी धारा फुटल्या
काकंन झाले चूंर ~
डोळे भिडता वेली लाजली
लाली सजला नूर
अवखळ गेला घाटं सरुनी
कलीका झाले फुल ~
रचना
प्र मो द शंकरराव घा टो ळ✍
अमरावती(विदर्भ)
📞8007413957
