तांबडसांज
तांबडसांज
1 min
40.2K
होता तांबडसांज पाखरे घराला येती
मंद सुगंधी प्राजक्त अंगणी दरवळती
तिन्हीसांजेला तुळशीपाशी दिवा तेवतो
होऊनी ध्यानस्थ हृदयी ईश्वराला ठेवतो
सायंकाळचा प्रहर रक्तवर्णी आकाश
दीपमाळेचा मंदिरात पसरला प्रकाश
घंटाध्वनी करी पावन सकल आसमंत
दंग सर्व भक्तीत जैसे विरक्त होती संत
नाम परमेश्वराचे घेता लाभे मनःशांती
देह होई प्रभू समरस जीवनाच्या अंती
