ताळेबंदी
ताळेबंदी
कोरोना महामारीने बंदिस्त केले सर्वांना..
बाहेर निघण्याच्या निर्बंधाने आळशी बनवले लोकांना...
बाहेर जायचे नाही, ऑफिस बंद, शाळा बंद सर्व काही बंद बंदच..
काम नाही, अभ्यास नाही, फिरायला जायचे नाही सर्व नाही नाहीच..
मग काय बसा घरी, बघा टीव्ही, काढा झोपा आणि व्हा आळशी..
नुसते उठणे, खाणे आणि झोपणे एवढेच काम, काम आवरतो कशी बशी..
टाइम पास करण्यात जातो दिवस जसा तसा ...
काही काम नाही म्हणून मग फोन घेऊन बसा..
स्पूर्ती, उत्साह हरवलं सर्व काही...
आनंदाचे सारे क्षणही दूर राही..
कधी सर्व काही पहले सारखं ठीक होतंय अस वाटतं आहे आता..
कधी जातात कोरोनाच्या या भयानक लाटा..
कधी एकदा सगळे वापस आपआपल्या कामावर परततील..
आणि दुःखाचे हे क्षण क्षणार्धात दूर पळतील..