ताजा मरवा
ताजा मरवा
1 min
68
पुस्तकातली खूण कराया,
दिले एकदा पिसे पांढरे,
पिसहून सुकुमार काहीसे,
देता घेता त्यात थरारे
मेजावरून वजन छानसे,
म्हणून दिला नाजूक शिंपला,
देता घेता उमेदवार काही,
मीना तयाचा त्यावर जरला
असेच काही द्यावे घ्यावे,
दिला एकदा ताजा मरवा,
देता देता त्यात मिसळला,
गंध मनातील त्याहून हिरवा.....
