STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

ताई

ताई

1 min
1.1K

भाऊबीज आणि रक्षाबंधन

या सणांची शोभा म्हणून

असणारी निव्वळ बाहुली


खेळणाऱ्या वयातच विळा-खुरपे

घेऊन शेतामध्ये राबणारी

शिक्षण सोडून भावंडांना

सांभाळत बसणारी


समजावून घेणारी आईची

उणीव न भासवणारी सावली

साधीसुधी पण भन्नाट रागाची

कंटाळा येतो म्हणून कामकरी

आशी आगळी वेगळी झिपरी


सगळ्यांच्या सुखासाठी धावणारी भिंगरी

मेहनत हे देवाने देलेले आंदन आहे 

लहानपणी आईच्या संसारात

मोठेपणी स्वतःच्या संसारात


भाऊबीज आणि रक्षाबंधन

या सणांची शोभा म्हणून

असणारी निव्वळ बाहुली

नसून ती लहान भावंडांची

आहे माऊली


Rate this content
Log in