STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

सय

सय

1 min
334

सख्या घट्ट मैत्रीतल्या

मैत्र जीवाभावाचेच

गोड गुपिते तयांची

साथ असे जोडीनेच


रम्य बालपण गेले

उष्ट्या चिंचाबोरांमधी

शैशवाची जाण आली

आस जडे मनामधी


स्वप्ने जोडगोळीनेच

आली नेत्रपटलात

भाव तारुण्यसुलभ

सांगू कसे गं शब्दांत


शेर दोघींचा देवाने

योजियला कोसांवरी

एक जाई नागपूरी

दुजी दूर कोल्हापूरी


चेह-याचे दोन डोळे

नित्यनेमे सान्निध्यात 

जरी दूरदूर गेले

सय येई अंतरात


आठवणी गुलकंदी

दोघींच्याही अंतरात

सय मनात फुलावी

बंध रेशमी मनात


साहित्याला गुण द्या
लॉग इन