स्वयंसिद्धा
स्वयंसिद्धा
नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर
आजची स्त्री स्वयंसिद्धा झाली
उत्तुंग भरारीने चढली यशोशिखरावर
आणि स्वबळावर ती नावारूपास आली १
सर्वच क्षेत्रात स्वयंप्रेरणेने अग्रेसर झालेली
वेळीच दुर्गा,चंडीकेचे रूप धारण करून
सुख नि दुःखात प्रामाणिक असलेली
खंबीरपणे शिक्षणाची कास धरून २
आजच्या नारीची किती गावी यशोगाथा
कर्तृत्ववान बनून धरला सावित्रीचा मार्ग
सक्षम,सबला,समर्थ,प्रगल्भ विचारांची सर्वथा
कर्तव्यदक्ष धडाडीने गाठला तिने स्वर्ग ३
जन्मदात्यांचा प्रेमाने सांभाळही करते
सासर नि माहेरची ती दुवाच जणू
आता तर सरणावर अग्नीही देते
तिला शूरवीर राणी लक्ष्मीबाईच म्हणू ४
रूप एकच पण अनेक तुझे अवतार
तूच दुर्गा,तूच कल्पना,तूच सिंधू
सारीच क्षेत्रे तू हद्दपार करणार
म्हणूनच तुझ्या उत्तुंग भरारीचे तोरण बांधू ५
आयटीपार्क,पायलट,डाॅक्टर, अंतरिक्ष
कुठेही तूच कामिनी,जुडी,सलमा, तूच दुर्गा
सर्वच क्षेत्रात आहेस तू अगदी दक्ष
सगळीकडे तूच चर्च,मंदीर,असो वा दर्गा ६
पदस्पर्शाने पावन झालेल्या नारींचा देश
तिथे अंधश्रद्धा,हुंडाबळी तू नाहीसे कर
दुर्गावतार घेऊन असिफाचा दूर कर क्लेश
काहीही करून तू शिक्षणाची कास धर ७
सिंधुताई,किरण बेदी,कल्पना चावला
देवी तू चंडीका,महिषासुरमर्दिनी
सार्यांची तू नारी आहे आदर्श सबला
राक्षसांच्या संहारासाठी अवतरली तू दामिनी ८
विज्ञान युगातील तू सफल,यशस्वी नारी
जोरदार वाजव तू डंका नारीशक्तीचा
जीवन तुझे होऊ दे सर्व जगाला भारी
तुला आशीर्वाद आहे आदिशक्तींचा ९
