सवय
सवय
1 min
174
एखाद्याची सवय होणं म्हणजे काय
कधी उमगलंच नव्हतं,
तुझ्या संगतीत ते नातं जडलं नि
'सवय' हीच ती असं जाणवतं गेलं...।।१।।
नाही म्हणता म्हणता आयुष्यात
किती काही बदललं,
तुझ्या संगतीत ते बदल ही
स्वीकार करणं आवडतं गेलं...।।२।।
सवयच असते ती
जी दूर जाऊ देत नाही,
किती जरी मनाला समजवलं
तरी ते ऐकत नाही...||३||
सगळं काही जवळ असून
काहीतरी कमीच भासते,
का तर..? मी तुला सतत
डोळ्यांच्या कडेच्या सावलीच शोधते...||४||
तुझी सवय करून नाही घेतली
ती नकळत होत गेली,
तुझ्या असण्याने ती जरा जास्तच
जवळ येत गेली...||५||
