सवय म्हणजे व्यसन
सवय म्हणजे व्यसन
1 min
15
स्वतःला लावून घेतलेली सवय म्हणजे व्यसन,
त्यासाठी तयारी यांची करण्याची कायपण.
काहींना चांगल्या सवयीची आस,
त्यासाठी ते नेहमीच घेतात ध्यास.
तर काहींना व्यसन असते वाईट,
म्हणूनच तर हे सदानकदा टाईट.
नाही सुटत व्यसन औषध पाण्याने,
ते तर सुटते फक्त आपल्या मनाने.
आपल्या मनावर असावा आपला ताबा,
व्यसन नक्कीच करेल तोबा तोबा.
नाही करत कोणाची पोलखोल,
हे तर माझ्या अनुभवाचे बोल.
