स्वतःसाठी जगायचं
स्वतःसाठी जगायचं
आयुष्याचे अनमोल क्षण
झुरलो दुसऱ्यांसाठी
उरलेच नाही कधी दोन मिनिट स्वतःसाठी
मरमर ती दुसऱ्यांसाठी
पडतच होते काहीतरी कमी
ठरवलं मी आता थांबायचं
स्वतःसाठी जगायचं.
केले जीवापाड प्रेम
वाढतच होता अपेक्षांचा गाव
प्रत्येक इच्छा पूर्ण नाही झाली
प्रेम करणारी व्यक्तीही रुसू लागली
हे असंच चालायचं
ठरवलं स्वतःसाठी जगायचं
नातीगोती जपत होतो
जोडत होतो एक तर दुसऱ तुटत होतं
तडजोड जोडा जोड करताना
विसरलो जगायचं कसं
ठरवलं आता स्वतालाच जोडायचं
विसरलेला हसू परत मिळवायच
आता स्वतःसाठी जगायचं
संसार घर सांभाळताना
आयुष्य शून्यच वाटायचं
ठरवलं शून्याची याची ताकद ओळखायचं
आता स्वतःसाठी जगायचं
स्वतःला निरोगी ठेवायचं
ज्ञानाने मोठ व्हायचं
सतत आनंदी राहायचं
स्वानंदी तर सार सुखावायचं
आता स्वतःसाठी जगायचं.
