STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

स्वतः

स्वतः

1 min
619

असा भेटलो आज स्वतःला, जसे की हरवलो होतो कधीचे.

वेळ खुप बदलला होता, आठवतोय दिवस आधीचे.


टप्पा एक एक सुटत गेला, स्पर्धेच्या या घाईत.

बालपनाची साक्षच दिसते, बाळाच्या या आईत.


पुन्हा एकदा जगतो आहे, आठवणींच्या सावलीत.

बाळासाठी तेवढच प्रेम, साठलय त्या माऊलीत.


पुन्हा तेच बालपण, येत आहे नजरेसमोर.

मोठ्याश्या झाडाला लागलेला, अजाणते पणाचा मोहर.


नाही भीती लोभ कपट की, नाही जाणीव सुद्धा.

काय बरोबर काय चूक, बालपणाला नसतो मुद्दा.


मोठा होत गेलो, तशी निरागसता मोडती झाली.

चांगल चालू असताना, जानते पणाची बुद्धी मध्येच आली.


जगतो आहे पुन्हा तेच आयुष्य, सुखाचे गाणे गाताना.

आज अचानक पुन्हा उलगडलो, स्वतःच भेटलो स्वतःला.


Rate this content
Log in