स्वर्ग
स्वर्ग
स्वर्ग नरकाच्या बाता करत असतात सर्व
स्वर्ग म्हणे आहे माझ्याकडे सर्व श्वाश्वत सुखसोयी
नरक म्हणे आहे माझ्याकडेही सर्व क्षणिक सुखसोयी
दोघे ही जुंपले एकमेका वरचढ वरचढ ठरण्या बातांच्या गराड्यात
मी बापुडा फसलो त्यांच्या बातांत!
फसलो त्या क्षणीक सुखांना
सापडत नव्हता तो मार्ग सुखाचा!
फिर फिर फिरलो अनेक गावांना, देशाना
उधळले पैसे त्यावर भौतिक सुख अनुभवण्या
अशांत मनाने फिरलो माघारी घरा!
घरात शिरताच वाटले शांत शांत मना!
खिडकितून बाहेर डोकावले दिसला सुंदर सूर्य उद्य
पक्ष्यांचा किलबिलाट झाडांवर विसावलेला
हिरवळ चोहूकडे मना शांत करण्या
वाहत होती संथ नदी जवळच
दिवस संपण्याची वेळ झाली सुर्याने दिली ललकारी गगनी
रंगांच्या त्या विविध छटा गगनातल्या आनंदायी डोळ्या!
घरात होत्या सर्व सुख सोयी
शांततेने घेतला माझ्या मनाचा ताबा आता
स्वर्ग अनुभवण्या का फिरु मी बापुडा आता!!
