स्वरांगी वाट
स्वरांगी वाट
1 min
23.4K
अनभिज्ञ उंबरा ध्येय अनामिक
वळणवाट काटेरी तप्त उन्हात
सुरेल स्वप्नांची साद अल्लड
कर्तृत्व खंबीर मनिच्छा उरात
सुर यशोभवी प्रयत्न नेमकेच
स्वरांगी वाट सफलता कवेत
सहकार्य प्रेरक अनुभव ओंजळीत
आशा सोनेरी नांदता मुठीत
अविरत उत्साह प्रतिसाद रेशमी
कौतुके भिनली मनात या ऊर्मी
पाहीजे ते मिळतेच जगती
होताच स्वैर कर्मिता हर्षस्वर्णी
पावलात रुजते सवय कठोर
रखरखत्या मार्गावर पहारा निष्ठुर
संयमे बाणता सहनशीलता अंगी
फुलते आयुष्यांगणी वाट सुमधुर
फुलते आयुष्यांगणी वाट सुमधुर
