स्वप्नसुंदरी
स्वप्नसुंदरी
रात्रीची चाहूल लागताच
मनी स्वप्नांचा हिंदोळा झुलतो;
त्या स्वप्नांच्या कल्पनाविश्वी
माझ्या शरीरातील कणनकण फुलतो
माझ्या मनी येणाऱ्या
प्रत्येक स्वप्नांची सुरुवात तू;
हृदयात तेवणाऱ्या प्रेमज्योतीची
पहिली फुलवात तू
अशांत मन माझं तुझ्या
आठवणींच्या अधीन आहे;
कसही असलं जगणं माझं
तुझ्याच स्वप्नांच्या स्वाधीन आहे
तुझे स्वप्नी येणे
नेहमीच मला सतावते;
झोप उडवून माझ्या
मिठीत येऊन बसते
माझ्या प्रत्येक श्वासात
भासवून स्वप्नी बोलावतो तुला;
का नको पाहू तुझी स्वप्ने
देवाने बनवलं मजसाठी तुला
अशीच येत रहा स्वप्नी
मला वाटेल तेव्हा;
इतकं प्रेम करू आपण
स्वर्गही फिका पडेल तेव्हा
मनातील प्रेमभावाची कळी
नेहमी स्वप्नापरी खुलावी;
माझी स्वप्नसुंदरी मला
या सहजीवनी मिळावी