स्वप्नातील माझे गाव
स्वप्नातील माझे गाव
वाटे वेगळी स्वप्नातली
मोहरणाऱ्या फुलांची
काट्यांना ही दूर सारी
प्रसन्नतेच्या गावाची. १
प्रेमाचे घर कौलारू
सजले अंगण एकोप्याचे,
राग लटका दूर जातो
हक्काच्या आपुलकीने. २.
चहूबाजूने विहरावा
गोकुळातला आनंद
वेड्या मनाचा तोल सावरी
मधुरतेचा तो छंद. ३.
सिंचन व्हावे प्रेमाचे
फुलुनी यावे मन अंगण
नात्यांचे बंध कोवळे
जपूनी मनाचे कोंदण ४.
स्वच्छंद हे मन पाखरू
अलगद आभाळी फिरावे
कणाकणातूनी मातीच्या
गीत अनोखे गुणगुणावे. ५.
निर्मळतेचा झरा पाझरो
उडो तुषार हर्षाचे
साथ-संगत मोलाची
आधार बनू परस्परांचे. ६.
