स्वप्नापरी
स्वप्नापरी
1 min
200
स्वप्नापरी दारात तू
क्षण भारले, हसला ऋतू
रोमांचल्या जाईवरी
हळवेपणा येई उतू
स्वप्नात स्वर झंकारले
रसदार झाली वेदना
रंध्रांतल्या ऊर्मीतुनी
गंधावली संवेदना
दारात तू येता अशी
हा उंबरा फुलवेलला
भेटीतल्या क्रीडा खुळ्या
पाहून काळच लाजला
दारात तू येता अशी
पंखावल्या लहरी किती
दुरातल्या रेषांवरी
एकात्म झाल्या की मिती
गुंत्यात गुंता वाढता
क्षण तेजता झाकोळली
जाळ्यातला सुटता तिढा
गगनात हो दीपावली
