स्वप्न
स्वप्न
1 min
180
शब्दरूपांना आकार देऊन
स्वप्न आले आकार होऊन
थोडाच अवधी राहिला आता
माणिक मोती येणार हाता
रचनांची होणार चहल पहल
लेखणीची मिळणार पहिली उचल
मुठीत साठले पकडले सहज
हळूहळू सोडायचा अलगद गज
परिसरखे उडून माशासारखे पोहून
भावना उधळती रोखणार कोठून?
रेलचेल जुळवणी पूर्णत्व आली
केलेली उजळणी फळास मिळाली
