स्वप्न मी पाहिलेले
स्वप्न मी पाहिलेले
1 min
166
वाट तुझी पाहाता
डोळेही आता शिणले
ये लवकर परतूनी सखे
बघ तुझ्यासाठी मी शब्दांचे जाळे विणले...
तुझ्या आठवणींची हलकीशी झुळूक
आणि मन माझे भरलेले
एक एकट्या एकांतात
कित्येक दिवस सरलेले...
झुरतोय मी असाच किती बघ
अश्रू पापणकाठावर साठलेले
अधुरेच राहील तुजविण
स्वप्न मी पाहिलेले..
