STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

सवंगडी

सवंगडी

1 min
12K

माझी सवंगडी न्यारी

कशी सांगू तिची प्रीती

होती हातात ती माती

फक्त खेळण्याची मस्ती


माझ्या सावांगडीचा

दिस कसा उजाडला

आणि कुठे तो संपला

कधी झाला नाही उलगडा


माझ्या सवांगडीचा

वही पुस्तक दुश्मन

शिवा शिवीचा तो डाव

चालतसे तो जोमन


माझ्या सावांगड्यांचा

होई कट्ट्यावर गप्पा

खेळण्यात दंग होता

धरून हणती ओ पप्पा


माझ्या सावंगडीचा

खेळ सावल्यांचा चाले 

कधी लागले खेळात

आई चपलेने मारे........


सावांगड्यांच्या हिंदोळ्यावर 

कोण घालते का साद

शोधा त्याच मैत्रीणीना

 जीव लावला तो खास


हळूहळू मागे जाऊ 

लहानपण मग अनुभऊ

गेल्या माघारी आठवणी

आज ओजळी त घेऊ 


चिऊ काऊ ची ती गोष्ट

आता नव्याने ती गाऊ

हात हातात धरून

छान फुगडी ती घालू


दूरदर्शन ची मालिका

आता नव्याने ती आली

रामायण ,महाभारतातील

व्यक्तिरेखा कशी चाले


जुने कालच तरीही

मन प्रफुल्लित झाले

आपल्या लहान पणीची

 किमया दिस रात चाले........


सावांगडीचच झोका गेला 

उंच उंच आकाशात

त्याने हिनाविले मला

तुझे पाय जमीनीत


शाळा शिकवी गुरुजी

पर डोक नाही चाले

खरा अभ्यास तो भारी

कीर्ती चोही कडे फिरे


कधी खिशाला ती कात्री

कधी अनवाणी पाय

लागी पायाला चटके 

तरी चालेना उपाय 


लहान पणाची ती बात 

अशी कशी विसरावी

कधी रागाने रडणे

कधी जल्लोष उरात


माझ्या सावांगडीची

काही बातच हो न्यारी 

आम्हा खायला होती

तेव्हा फक्त तो भाकरी.......


लहान पणी सवंगडी

खेळ खेळतात भारी

भातुकलीच्या त्या खेळामध्ये

येई भलतीच ती गोडी


कधीकाळी मैत्रीसाठी

जीव आसुसला जाई

आता मात्र मैत्रीसाठी 

वेळ पुरेनासा होई


जसा कृष्ण साद घाली

त्याच्या लाडक्या राधेला

तशी मिरा जीव लावे

तिच्या जिवाच्या कान्हाला


 एकच व्यक्ती परंतु 

कृष्ण दोघींचा ही मित्र

किती गूज ते मैत्रीचे 

सांगू मीच अहोरात्र


लहान पणाची नवलाई 

जीव ओवाळून टाकी

मित्र मैत्रिणीचा तांडा

फिरत असे भोवताली


माझी धांकली बहीण 

जेव्हा रडे हंबरून

घेऊन तिला कडेवर

भटके मी गावभर


कशी सवंगडी माझे

माया अजूनही तशी

आम्हा बहिणींचे नाते 

अजूनही जिव्हाळ्याची ........


Rate this content
Log in