स्वल्पविराम
स्वल्पविराम
लिहिताना जर एका वाक्यात
अनेक शब्दसमूह आले तर
जे चिन्ह वापरतो ना तेच
स्वल्पविराम चिन्हआहे खर.....
लिहायला घेतले काहीही छान
नदी,डोंगर,ढग,सूर्य,पाणी,तुला
या प्रत्येक शब्दात स्वल्पविराम
येईन हो छान आपल्याला वाचायला...
नभ मंडप,सप्तरंगी इंद्रधनुष्य कमान
नयनमनोहर देखणे सौंदर्य या सृष्टीचे
दोन वाक्य जोडणे अती महत्वाचे हो
काम आहे या स्वल्पविराम अलंकाराचे...
कविताही सजते अनेक शब्दांमधुनी
यातील अचूक शब्दांचे वाचन करताना
स्वल्पविरामाच्या चिन्हाने शब्दांचे छान
सोपे सोपे भाग होतात वाचताना....
अलंकारीक शब्दांची मराठी भाषा
स्वल्पविराम,अल्पविराम याने सजलेली
वाचताना,बोलताना सदा उपयोगी
या विरामचिन्हांनी मराठी भाषा नटलेली....
