स्वच्छतेचा दुत
स्वच्छतेचा दुत
जन्मा आला ढेबु गरीबाच्या घरी
भार डोईवरी साहियले........
स्वच्छतेचा दुत म्हणतात त्यांना
जीवन वाहिले सेवेसाठी .........
मनी लागे ध्यास लोकांचा ईकास
कळवळा त्यास येत असे ........
गावोगावी जाई सांगे लोकायले
कीर्तनात बोले महाराज ...........
फासती शेंदूरं लावती कापूरं
श्रद्धां देवावरं ठेवतिया ..........
देवाच्या नावानं फसविते साधू
असले हे भोंदू. ढेबु म्हणे. ........
नवस बोलती बकरे कापती
पोरगा मागती भोळे जनं ...........
सांगे ठासूनिया बाबा कीर्तनात
नाही दगडात देवपणं ..............
नाही देव देतं पोरगं तुमाले
नाही नवसाले पावनारं ...........
सोडा अंधश्रद्धा नका लागू नादी
त्यात बरबादी तुमचीचं ...........
जन्मभर केला बाबांनी प्रचारं
त्यागिला संसार सेवेसाठी .........
पोराले शिकवा शाळेत पाठवां
जीवन घडवां पोरायचे........
नाही देवळात नाही दगडात
देव माणसात पहावा जी ..........
देव नाही देत मूलबाळ कुणा
खोटी ही भावना अंधश्रद्धा .......
सर्वांवर प्रेम करा तुम्ही जण
सगळे समान समजून ..........
भुकेल्याला अन्न पोटभर द्याहो
उपाशी न राहो अण्णा विनं ...........
