स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियान
1 min
644
स्वच्छतेचा हा घेतला वसा
शहर करूया लख्ख आरसा
देश आपला घडे
पाऊल एक स्वच्छतेकडे।। १।।
रस्त्यावरती नको तो कचरा
दूषित होई परिसर सारा
चला घंटागाडीकडे
पाऊल एक स्वच्छतेकडे।। २।।
ओला सुका, कचरा वेगळा
आरोग्याचा फुलवितो मळा
घ्या स्वच्छतेचे धडे
पाऊल एक स्वच्छतेकडे।। ३।।
जिरत नाही, कुजत नाही
प्लॅस्टिक आपली जिरवू पाही
पर्यावरण हे बिघडे
पाऊल एक स्वच्छतेकडे।।४।।
पिचकाऱ्या त्या भिंतीवरती
जंतू पसरती, अवतीभवती
थुंकू नका इकडे तिकडे
पाऊल एक स्वच्छतेकडे।।५।।
शहर हे आपले ,सुंदर सारे
मिळून करूया आपण या रे
द्या हात हातामध्ये
पाऊल एक स्वच्छतेकडे।।६।।
