स्वच्छंदी
स्वच्छंदी
1 min
170
दारापुढे रांगोळी
तोरण दारावर
नवनवरीचे हात
रंगविल्या भिंतीवर....
सजले अंगण छान
नटले घर बाई
सोफा बसायला छान
अंगणात सुगंधी जाई....
खिडकीत आली
चिऊ चिऊ चिमणी
काव काव कावळा
त्यांना ठेवू दाणापाणी....
देखणे डेरेदार वड
वडाभोवती डेरेदार पार
बसती वृद्ध सारे इथे
गप्पा मारती सारासार..
देखण्या अंगणात
देखणे वृंदावन
तुळस लावी त्या
तुळशीमातेस वंदन....
सजल्या या अंगणात
स्वच्छंद झेपावताना
मनी होतो खूप आनंद
आठवणी साठवताना.....
