स्वच्छ ग्राम
स्वच्छ ग्राम
शेती फुलते,आंबा मोहरतो,
पिक पाणी बरे,वाहते नदी,
गाई गुरे,चरती डोंगरावर,
शेळी मेंढी पालन उद्योग चाले,
ग्राम ग्रामात भारत माझा.
आता आहे बरे,
पुर्वी काही नव्हते,खरे,
ना दवाखाना ना शाळेची सोय,
भोगी दैन्य सारे,ग्रामिण जनता.
खेडे, वाड्या वस्ती भारत माझा.
झाल्या सुधारणा,थोड्या तरी,काही,
सुशिक्षित जनता, ग्रामपंचायत,
कंम्पुटर आला,नेट इंटरनेट दाखवी ज्ञान
शेती उत्पादने वाढली फार,
हुशार झाली ग्रामिण जनता
ग्राम ग्रामात भारत माझा.
एक काळ होता,
अशिक्षित जनता,नव्हते,ज्ञान,
स्वच्छता काय न कळे काही,
रोगराईशी सामना करी,
पाणी अस्वच्छ,रस्त्यात घाण,
असा होता भारत,
खेडोपाडी.
आता झाला उपाय,
गाडगेबाबा स्वच्छ ग्राम,
थोडे थोडे उद्योग,सुरु करा काही,
पाणी भरा जल खेडे सारे,
खेड्यातला तरुण खेड्यात थांबवा,
उद्योग काही द्या हाती,
सुजलाम सुफलाम खेडी करा.
शहरांचा फुगवटा आता खुप झाला,
चला चला जाऊ खेड्याकडे,
उद्योगाचे जाळे खेडोपाडी,
प्रदुषण मुक्त भारत करु.
वाड्या,वस्ती, खेडे भारत माझा.
