STORYMIRROR

Anagha Kamat

Others

3  

Anagha Kamat

Others

स्वच्छ देश

स्वच्छ देश

1 min
193

पाणी पिऊन बाटली फेकून 

खाऊ खाऊन प्लास्टिक टाकून 

सगळीकडे कचऱ्याचा डोंगर करून 

 माणसा तूं काय साधणार ? 


झाडे समूळ कापून काढून 

निसर्गाचा विनाश करून 

आपल्याच पांयावर कुऱ्हाड मारून 

माणसा तूं काय मिळवणार? 


वाईट, दुष्ट स्वार्थी होऊन 

एकमेकांशी लढून भांडून 

जमिनीचे आपसांत वांटे करून

माणसा तूं काय करणार? 


प्रत्येकाने घाम गाळायचा 

कचरा इथे तिथे नाही फेकायचा 

देश प्लास्टिकमुक्त करायचा 

झाडे लावायचा उपक्रम हाती घ्यायचा 

देश आपला स्वच्छ ठेवायचा


Rate this content
Log in