स्वभावाला औषध असतं
स्वभावाला औषध असतं
1 min
81
स्वभावाला औषधं असतं
पण ते वेळेवर घ्यायचं असतं …
अधिरातला "अ " काढुन
थोडं धीरान घ्यायचं असतं …
संतापातला " ताप " सोडून
मनाला संत करायचं असतं .…
मनातला " हट्ट " सोडून
नातं घट्ट करायचं असतं …
माझ्यातला "मी " सोडून
तिच्यातला " ती " जपायचं असतं …
एकाच दिवशी नाही तरी
हळूहळू बदलायचं असतं …
थोडं थोडं का होईना
रोज प्रेम दयायचं असतं …
एकाचा राग दुसऱ्यावर न काढता
समोरच्याला समजून घ्यायच असतं …
स्वभावाला औषध असतं
पण ते वेळेवर घ्यायचं असतं …
