स्वभाव...!
स्वभाव...!
सुम्ब जळाला तरी त्याचा
पीळ काही जात नाही
स्वभावाचा हेकटपणा सुद्धा
हटता हटत नाही
प्रतिमा जपण्याच्या नादात
वास्तव लपवता येत नाही
वास्तवाची जाणीव तेंव्हा
उमजल्यावीन रहात नाही
किट्टण संस्कारच असं
निघता निघत नाही
गुरफटल्या विचारांचा
गुंता सुटता सुटत नाही
दृष्टी तशी सृष्टी
हे काही केल्या पटत नाही
स्वभाव दोष आपला
आपोआप नाहीसा होत नाही
प्रयत्ने वाळूचे कण रगडता
तेलही गळे हे जाणता येत नाही
हातच्या काकणाला आरसा कशाला
याच्यावर सुद्धा विस्वास् बसत नाही
आडात नाही तर पोवऱ्यात कोठून येणार
याची जाण झाल्यविन राहत नाही
स्वभाव बदलल्या विना
जीवनाचा खरा अर्थ कळत नाही
सारे ज्ञानामृत प्राशून सुद्धा
कधी कधी फरक काही पडत नाही
पालथ्या घड्यावर पाणी
ओतून काही उपयोग होत नाही
आतूनच बीजांकुर संस्काराचा
फुटल्याविना जीवन घडत नाही
अंतराचा ठाव लागल्याविना
जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही....!
