STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Others

3  

Anjali Bhalshankar

Others

स्वैर पाऊस. ....

स्वैर पाऊस. ....

1 min
200

स्वैर मुक्त निरागस बागडणाऱ्या खट्याळ बालका सम पाऊस आला

काळ्याकुट्ट ढगांचे बांध तोडुनी बेधुंद मुक्त करूनच जणू पाऊस आला

झाडे वेली पशु पक्षी दर्या डोंगर नदी-नाले मदहोश वारे घेऊन भिजवत पाऊस आला. 

मनसोक्त धुंद आपल्याच मस्तीत मुग्ध होऊन सळसळत पाऊस आला

तप्त ओसाड रान करपल्या भेगाळ धरतीची भागवाया तहान होऊन सखाच जणू पाऊस आला

 काळया मातीत पेरल्या बीयाला फुलविण्या अंकुर पसरत सुगंध मातीचा

आसमंत भर बेभान वाहणारे वारे विजेच्या तांडवा सह वादळाचा आवेग होऊन पाऊस आला.

 थेंब थेंब शोषला त्या आगीचा तप्त गोळ्याने नदी-नाले सागरासह शोषले ओलेपणही पृथ्वीचा गर्भातले

उघडले दार आज जणू स्वर्गातल्या खजिन्याचे.शोषुन थेंब झाले आता मोत्याचे.

त्या मोत्याचेच सडे भूवरी उधळीत सुगंधी अत्तर घेऊन सोबत

लेने हिरवाईचे उतराई तिचा होण्यास जणु मान झुकवून पाऊस आला.

ओलेपण धरतीच्या गर्भाचे परत कराया नववधूचा रंगीबेरंगी साज घेउन सखा होऊन पाऊस आला


Rate this content
Log in