STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

1 min
11.8K

अंदमानाची कोठडीही ती

किती भाग्यशाली म्हणावी

सावरकरांच्या पदस्पर्शाने

पावन ती झाली भूमी


सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली

विदेशी कपड्यांची केली होळी

मायभूमीच्या निस्सीम प्रेमापोटी

जन्मठेपेची शिक्षा भोगली


हालअपेष्टा, मरणप्राय यातना

देह खंगला होता जरी

देशप्रेम रक्तात भिनवुनी

स्वातंत्र्याचे स्वप्न उरी


खिळे, कोळशे झाली लेखणी

कोठडीची शीलाही सजली

भारतभूच्या महाकाव्याने

भारतीयांची अंतःकरणे भिजली


देशभक्तांचे स्फुर्तिस्थान ते

विनायक दामोदर सावरकर

'स्वातंत्र्यवीर 'या उपाधीने

जगी जाहले अजरामर


Rate this content
Log in