स्वातंत्र्यलढा !!
स्वातंत्र्यलढा !!
दीडशे वर्ष राज्य केले
दीडशे वर्ष त्यांनी फसविले
न हवे सर्व काही मागण्या
भारतीयांवर लादण्यास यशस्वी ठरले!!धृ!!
पण हे काही पूर्ण वेळ टिकणार नव्हते
अस्तिव त्यांचे संपविणार होते
रक्षणार्थ वीरमरण पत्करलेल्या
भारतीयांचे अस्तिव उदयास येत होते!!१!!
कित्येकाने प्राण वाहिले
कित्यकाने संसार त्यागियले
कित्येकाने जन्ममरणोत्तर सत्र
हे अगदी जवळून पाहिले!!२!!
पण आम्ही कधी हरलो नाही
आम्ही कधी संपलो ही नाही
जात-पात ह्या तारमेळात त्याकाळी
आम्ही भारतीय कधी गुंतलो ही नाही!!३!!
गातो आम्ही म्हणतो आम्ही
ह्या स्वातंत्र्याची गौरवगाथा
जन्म मिळो पण नव्याने मिळो
ह्या भारत भूमीत सदैवतः
ह्या भारत भूमीत सदैवतः!!४!!
