STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

3  

शिवांगी पाटणकर

Others

स्वातंत्र्यलढा

स्वातंत्र्यलढा

1 min
429

सोडविण्यास देशास इंग्रजांच्या गुलामगिरीतूनी

लढले सारे क्रांतिकारी एकजूट होऊनी


हाती घेतली स्वातंत्र्य चळवळ सोडूनी सारं घरदार

राहिले इंग्रजांशी लढत मानूनी एकमेकांनाच आपला परिवार


घेऊनी स्वातंत्र्याची मशाल

पेटविली इंग्रजी सत्ता विशाल


वंदे मातरम् अन् इनक्लाब जिंदाबादचा देत नारा

इंग्रजांशी लढण्यास एकत्र झाला देश सारा


भारतमातेस इंग्रजांच्या ताब्यातूनी करण्यास आजाद

लढले टिळक फडके सावरकर बिस्मिल अन् आझाद


भगतसिंग राजगुरू अन् सुखदेव हसत फाशीवर चढले

जीवाची न करता पर्वा सारे भारतमातेसाठी लढले


अखेर ब्रिटिश साम्राज्यावरील मावळला सूर्य

अथक प्रयत्नांनी झाले साऱ्यांचे स्वप्न पूर्ण


होऊनी यशस्वी स्वातंत्र्यलढा तो सुवर्ण क्षण आला

उगवला तो सोनेरी दिवस अन् भारत देश स्वतंत्र झाला


Rate this content
Log in