स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
1 min
297
देश आमचा भगवंत
देशभक्ती अमुचा धर्म,
त्याच्यासाठी शहीद किती महंत
जाणुनी त्याचे मर्म् !१!
जातीधर्माच्या ही पलीकडे
असतो आम्हाला देश,
भारतमातेला अर्पण
तिरंगा रुपी वेश !२!
आले मातेवर संकट
येतो एकत्र द्वेष विसरून,
शहिदांना आपल्या कुशीत
घेते भारतमाता बाहुस पसरून!३!
करण्या काम आम्ही सदा तैयार
देश आणि धर्मासाठी,
नाही गरज कोणत्या पुरस्काराची
करण्या आमच्या ठरल्या कर्मासाठी!४!
भगवंता आमचा प्रत्येक श्वास
भारतमातेसाठी वाहावे,
इतिहासात आईसोबत
ह्या लेकराचेही नाव राहावे!५!
