STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

सवाश्या

सवाश्या

1 min
270

किती सवाश्या त्या गोष्टी

किती उलट्या त्या झाल्या

किती उलट्या त्या गोष्टी

किती सवाश्या त्या झाल्या।।धृ।।


माप दार ओलांडता

दार फिरे दारोदार

कडी कोंडा त्या घराला

किती गवस्या त्या झाल्या।।१।।


माय मरो मौशी जगो

म्हण खोटी खोटी ठरो

माय मरता बाप रे

किती मावश्या त्या झाल्या।।२।।


यात्रा भरते सरते

सरते यात्रा उरते

उरती नुस्ती सिते

किती नवश्या त्या झाल्या।।३।।


प्रीत पतंगाची सरी

भुंगा फुला संवे जरी

काटा विश्वासाचा उरी

किती हवश्या त्या झाल्या।।४।।


साज सांजवेळी केला

सांजवाती सखा आला

बाधा मन त्या प्रितीला

किती हताश्या त्या झाल्या।।५।।


चंद्र कोरा लोरी बाई

दिसा मागे दिस जाई

चोळी अमावस्या घाई

किती निराश्या त्या झाल्या।।६।।


सुर जुळे शब्द जुळे

जुळता तारांची मळे

बेसुर गाती कावळे

किती बंदिश्या त्या झाल्या।।७।।


Rate this content
Log in