STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Others

3  

Urmi Hemashree Gharat

Others

स्वानुभव...

स्वानुभव...

1 min
11.5K

आपलं म्हटलं की सारं आपलचं असते

असं कधीही समजू नये

प्रत्येकाच विश्व निराळ असते

हे शाश्वत सत्य कधीही विसरु नये.


आपुलकी प्रेम माया वाटत राहायचं

आपल्याला ते मिळेल ह्याची वाट पाहू नये

आपल्या मताप्रमाणे वागतील सारें नेहमी

ह्या फाजील भ्रमात कधीही राहू नये


कष्टाविना फळ मिळत नसते हे ध्यानी ठेवावं

मिळतयं सर्व मोफत म्हणुन फुकट काही घेऊ नये

फुकट मिळालेलं सहज संपत बहुधा

काम करायला कधीही लाजू नये


जगती जगताना निंदकाचे थवे बरळती

निमुट कर्म करावे तेथे लक्ष देऊ नये

आयुष्यांगणी स्वप्नपुर्तीं होतेच प्रामणिकाच्या

यास्तव संयमाचा खडतर मार्ग कधी सोडू नये


Rate this content
Log in