स्वामीसेवा
स्वामीसेवा
निरपेक्षपणे सेवा कराल तुम्ही
काही पडणार नाही तुम्हाला कमी
ही आहे तुम्हाला स्वामीसेवेची हमी
होय पाठीशी असतील प्रत्यक्ष स्वामी
स्वामींचा धराल तुम्ही सदैव ध्यास
स्वामींचा जर असेल मनी निरंतर वास
सुखकर होईल तुमचा जिवनप्रवास
सोबत नेहमी असेल स्वामींचा सहवास
जे भक्त स्वामी मार्गाने चालतात
जनसेवा हि स्वामीसेवा मानतात
ऐसें भक्त स्वामींना प्रिय ठरतात
त्यांची संकटे स्वामी वरचेवर झेलतात
जीवनात जर रहायचे तुम्हास खुशाल
रहस्य सांगतो मी विशाल
स्वामीसेवेची हाती घ्या मशाल
स्वामी देतील कृपेची शाल
