STORYMIRROR

Padmakar Bhave

Others

2  

Padmakar Bhave

Others

सवाल

सवाल

1 min
8

संपते कुठे ती, ती तर सदाच उरते आहे,

शब्दांना धरुनी हाती कवितेतून झरते आहे,


जन्मली जरी ती केवळ माझ्यासाठी

हररोज नव्याने ती पुनश्च जळते आहे 


ती रोज फुलवते जरी का बाग बगीचा,

का शेज फुलांची तिजला छळते आहे


मी ठार आंधळा,बांधून आहे पट्टी

हा सुरा कुणाच्या हाती कळते आहे


मी लाख दिली ती हाक तरी हो यारो

हे भाग्य कुणाच्या पाठी पळते आहे?


शब्दांच्या का होती तुलना स्पर्धा ?

रुसलेली कविता मजला पुसते आहे


Rate this content
Log in