सवाल जबाब
सवाल जबाब
1 min
491
तो
एक पुसतो सवाल ऐसा
उत्तर देशील का राणी ग
जमा खर्चाचा डाव मांडतो
कुठला असा प्राणी ग
जिजिजी रामा दाजी तू ग
मैना माझी तू ग जिजिजी
ती ( उत्तर )
झाली चूक भूल देणे घेणे
हीच जगाची रीत खरी
शिव शक्तीची ताकद भारी
कोण करील रे बरोबरी
धर्तीवर पाऊस बरसतो
एकमेकांना असती ओढ
सारीपाट मांडला प्रपंचाचा
जन्म जातीच फळ हे गोड
नारी वीण नर हे निपजती
जन्मघेणार पुरुष बीज
ढगफुटीला ढग हे कारण
घर्षणाने चमकते वीज
दिव्याला ही वात पाहिजे
वातीला गरज पणतीची
वात जळाया तेल पाहिजे
तेल जळाया ठिणगीची
दिल्या घेतल्याशिवाय जन्म
नाही र
व्यवहार हा जगता चा
आंबेचा पोत जाळुनी
सम्बळ वाजव गोंधळाचा
जिजिजी र जी
रामा दाजी तू र सजने माझी तू ग
जिजिजी
