STORYMIRROR

Sonam Thakur

Others

4  

Sonam Thakur

Others

स्वाभिमानी मी अभिमानी मी

स्वाभिमानी मी अभिमानी मी

1 min
405

समजू नका मज अबला 

आज ही आहे सशक्त मी, आज ही शूर मी

स्वाभिमानी मी, अभिमानी मी....


परिस्थितीची ठेवुनी जाणीव मी

प्रसंगास असते नेहमीच तत्पर मी 

शक्ती ही मी, शारदा ही मी

समजू नका मज अबला

आज ही सशक्त मी, आज ही शूर मी....


संसाराच्या चडाओडीत न ढासळता

वेळेस राहते नेहमीच खंबीर उभी मी

जानकी ही मी, जिजाऊ ही मी

समजू नका मज अबला

आज ही आहे सशक्त मी, आज ही शूर मी....


माजतो अधर्म आणि अत्याचार जेव्हा 

संहार करण्यास पुन्हा जन्म घेऊन येते मी

दुर्गा ही मी, काली ही मी

समजू नका मज अबला 

आज ही आहे सशक्त मी, आज ही शूर मी....


समाज घडवणारी सावित्रीबाई मीच

मातृभूमीच्या सेवेस सदा तत्पर ती लक्ष्मीबाई ही मी

लाखो अनाथांची आई सिंधू ताई मी

पीडितांची अहोरात्र सेवा करणारी आमटेंची साधना मीच

यामपुरीतून पतीचे प्राण सुखरूप आणणारी सावित्री ही मीच....


समजू नका मज अबला

आज ही आहे सशक्त मी, आज ही शूर मी

स्वाभिमानी मी अभिमानी मी.....


Rate this content
Log in