सुवर्णकाळ
सुवर्णकाळ
1 min
12K
बालपणी केले जे काही
त्याची मज्जाच और
रोक टोक ना कशावर
बुद्धीच साऱ्याची टौर
परी धमाल चिंचा बोराची
जांब लयी गोडच गोड
झोके भिडती उंचच उंच
सुर पारंब्यांला नाही तोड
मळ्याला भेट रोजच रोज
मोटेच्या पाण्यात भिजायची
मज्जाच न्यारी चिंब होत
बोट लहरत आमची पोहायची
कागदाची विमान करून छान
उडवलीय आकाशात दूरच दूर
स्वप्न ही पाहिलंत त्याबरोबर
तेव्हा नव्हती तुटण्याची हुरहूर
अथांग बुडालो होतो
लहानपणाच्या सागरात
कागदी विमाने, होड्या
खेळलो खूप आनंदात
