सूर्याची किमया
सूर्याची किमया
रात्र उलटून जाते
लागतात सकाळ होण्याचे वेध
मनी जागते एक नवी उमेद ☺️
होते सुंदर दिवसाची सुंदर पहाट
नव्या आशेचा,
नव्या सूर्योदयाचा असतो
एक वेगळाच थाट
सूर्य नारायण तुझी किमयाच न्यारी ☀️
रोजच जागवतो दुनिया सारी
किलबिल पाखरांची कानी पडे
दाही दिशा ह्या प्रभू नामाने गुंजे
सडा-रांगोळीने अंगण साजे
आसमंत सारे मोहूनिया निघे
दूर होई रात्रीचा उंच उभा किनारा
रंगून जातो आसमांत सारा🌈
चोहिकडे वाहतो हा उनाड वारा
आनंदातून होई हा दिवस तुझ्यामुळे नवीन साजरा☺️
सर्व निर्मितीचा तूच करितो प्रारंभ
सर्व कामाला तुझ्यामुळेच
होतो आरंभ
विश्वाच्या पसाऱ्यात तू एक तारा
पण कर्माने विशाल प्रकाशाचा देतो झरा💫✨
नवचेतना, नवी संधी, उत्सव घेऊन येतो नव्याने जीवनी
नवप्रेरणांची नवी
नवी आशा पाहुनी
रोज नव्याने उगवतो
आशेचा सूर्योदय
ज्याच्या त्याच्या विचारांचा होतो
तुझ्या मुळेच नव्यानेच उदय
म्हणूनच
ध्येय असावे रोज नव्हे
सत्कर्म करावे, आदर्श जपावा
स्वच्छ निर्मळ भाव मनी वसावा
मानव असो वा पशू-प्राणी प्रत्येकास समान लेखावे
कामे होतील सुंदर नवे सगळे घ्यावा नवा ध्यास
नमन करावे रोज नवे आयुष्य
जगण्यास खरं तर हेच हवे
अशीही याची किमया ही रम्य सकाळ ओढ लावते जीवाला
भाव भरल्या मनाने धन्यवाद देऊ या देवाला...👏👏
