STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सूर्य विकणे आहे...!

सूर्य विकणे आहे...!

1 min
301

काय करायचं काही कळेना

उन्हाचा या दाह साहवेना

पोटाची खळगी भरेना

मार्ग मज दुजा कळेना...


सर्व सुख दुःखाचे

कारण सूर्य बापडा

टाकला एक दिनी

त्यावरी मी कपडा...


जळून खाक होताच

मज वाटले

ठेवणे त्यास अंतरी

आता उचीत होणार नाही...


बाजारी ब्रम्हांडाच्या

त्यास विकण्याविन पर्याय नाही

त्यास विकल्याविन आता

मज चैन पडणार नाही...


पहाटे पहाटे घेतले

त्यास अलगद टोपलीत भरून

हातासी धरले लेकरू

अन चालले विकण्या न्याहरी करून...


सूर्य घ्या सूर्य, सूर्य घ्या सूर्य

ठोकली आरोळी दम लावून

आले पर्यावरण वाले धावून

जो तो पाही मज कावून...


सौदा पटला ,बजेट सारे

ढपले सोयीस्कर पाडून

सूर्य उडाला आकाशी

मज वेड्यात काढून...


स्वप्न भंगले माझे

लेकरू रडता घाय मोकलून

पोटाची खळगी कावते

भर मध्यान्ही कावळे कोकलून...


तरीही हसते मी

भर उन्हात टोपलीत सूर्य आहे म्हणून

काय सांगू तुम्हाला

काय मिळणार मज सुर्या विकून...?


Rate this content
Log in