सूर
सूर
सूर ऐकलास का माझा
सूर बालपणीचे बोबडे बोल
आई दादांची लाडकी लेक
खुशीचा त्यांच्या नव्हता मोल
शाळेतला माझा सूर
वेगळा दफ्तराचा घालून पसारा
मैत्रिणींच्या गप्पांचा मेळा
खेळण्यात रमण्याचा रंगच न्यारा
तरूणपणी तनामनाचे रूप
शोधू लागले मन गाण्यातले सूर
अल्लडपणा अंगात माझ्या प्रत्येक गोष्टीला जास्तच हुरूप
मेहेंदीचा जेव्हा चढला लाल रंग हातातल्या चुड्याचा लाजरा सूर
गालावर चढला गुलाबी रंग
अंगाला लागली हळद पिवळसर
कुंकवाचे माझ्या तेजच भारी
सैन्यामध्ये करे नोकरी देशप्रेमाचा त्यांचा सूर
फौजीच्या नावाचा मला अभिमान भारी
उमलली कुशीत माझ्या दोन फुले
त्यांच्या सुरात मी रंगले
सहजीवनाचा गोड सूर
आयुष्य माझे प्रेमाने भरले
