सूर गेले दूर आता
सूर गेले दूर आता
1 min
225
सोडुनी कंठास माझ्या सूर गेले दूर आता
साजणी जाताच झाले गीतही बेसूर आता
चंदनी गंधात न्हालो लोळलो प्रेमात ज्यांच्या
माय बापाच्या वियोगे पोळलो भरपूर आता
शांत आयुष्यात आली लाट दुःखाची त्सुनामी
दाटला डोळ्यात माझ्या आसवांचा पूर आता
सोयरे गणगोत मित्रांचा गराडा भोवताली
मी भुके कंगाल होता जाहले निष्ठूर आता
कल्पनेचा घेत झोका पाहिले स्वप्नास मोठ्या
पंडिता झाले तुझे ते स्वप्न चक्काचूर आता
